सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश खांडेभराड महाराष्ट्र लोकनायक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- लोकमान्य टिळक जयंती निमित्त शेगाव येथे महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार वितरण सोहळा 1 ऑगस्ट रोजी पार पडला
देऊळगाव राजा येथील निवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, तथा सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा येथील अध्यक्ष श्री काशिनाथ (प्रकाश) पांडुरंग खांडेभराड यांना त्यांच्या शैषणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.
हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा लोकमान्य टिळक जयंती व दैनिक लोक युवा वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 चे आयोजन संत गजानन महाराज अभियांत्रिकी विद्यालय येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते. यावेळी 628 प्रस्तावांपैकी निवड करून 125 मान्यवरांना राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.
पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विजय कुळकर्णी ज्येष्ट पत्रकार तथा जिल्हा प्रतिनिधी तरुण भारत, चंद्रकांत घोराडे शहर अध्यक्ष भाजप, बाळासाहेब दामोदर उद्द्योजक, हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक , अभिनय, अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल केसकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.



