ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल श्री माहुरे , समिती प्रमुख प्रा नंदा भोयर , प्रा प्रशांत पवार ,प्रा नरेंद्र हेपट , प्रा माधुरी पेटकर उपस्थित होत्या, सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



