गुन्ह्यातील आरोपी दोषी ; १ हजार रु. दंड न भरल्यास कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा येथील मा. मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्रीमती एम. वाय. डोईफोडे यांनी अप.क्र. १०/२१ कालम ३२४ भादंवि मध्ये आरोपी श्रीमती तुळसा भिमराव शेंडे वय ६० वर्ष रा. दिंदोडा (मदनी) जिल्हा वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम ३२३ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असून १,०००/- रु दंड दंड न भरल्यास ३० दिवस साधा कारावासाची शिक्षा.
यातील आरोपी व फिर्यादी नामे श्रीमती उज्वला जगनराव शेंडे वय ४८ वर्ष रा दिदोडा (मदनी) या जावाजावा असुन एकाच घरात वेगळे राहतात. नमूद घटना ता. वेळी व स्थळी शाळेतुन घरी आले असता आरोपीने फिर्यादीस हे घर तुझे नाही यावरुन वाद होवून आरोपीने फिर्यादीच्या उजवे हाताचे मगनटावर चावुन जखमी केले, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट बरून पो.स्टे. सेवाग्राम अप.क्र. १०/२१ कालम ३२४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सफो प्रमोद तोंडसे व.नं १०५७ यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले, सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता समीर ढुंगे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार पोअं चंद्रकांत कोहचाडे ब.नं १६२२ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे ठाणेदार स.पो.नि.श्री. ठाकुर यांनी सुध्दा सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्य प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्रीमती एम.वाय. डोईफोडे यावरून गुन्ह्यातील आरोपी कलम ३२३ भादंवि मध्ये दोषी दरविण्यात आले असून १०००० दंड, दंड न भरल्यास ३० दिवस साथा कारावासाची शिक्षा,



