ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने माजी राष्ट्रपती स्व ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :- भारताचे ११वे राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न स्व डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा, सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा,जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी मामा, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विनायकराव कुळकर्णी सर होते.सर्वप्रथम स्व ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी अरुण सपाटे, प्रा अशोक डोईफोडे, मधुकरराव धुळे, प्रा.विनायकराव कुळकर्णी , प्रकाश अहिरे यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अहिरे यांनी केले केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये