ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा तहसील कार्यालयाची धडक कामगिरी: १ जून ते २० जुलै दरम्यान हजारो दाखल्यांचे ऑनलाईन वाटप!

विद्यार्थी व ग्रामस्थांची वेळेची बचत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा .अशोक डोईफोडे

उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती

सिंदखेडराजा :- तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा तहसील कार्यालयाने शैक्षणिक सत्र आणि विविध शासकीय योजनांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रमाणपत्रे वितरीत करण्याचा मोठा विक्रम नोंदवला आहे. १ जून २०२६ ते २० जुलै २०२६ या कालावधीत नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे व महसूल सहाय्यक संजय सोनुने यांच्यासह महसूल पथकाने ‘युद्धपातळीवर’ काम करत हजारो विद्यार्थ्यांना व नागरिकांना दाखल्यांचे वाटप केले आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा-कॉलेजमधील प्रवेशासाठी आणि विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दाखल्यांची प्रचंड गरज असते. दूरवरून येणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी तसेच वेळेची बचत व्हावी यासाठी सिंदखेडराजा तहसील प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अत्यंत पारदर्शक व जलद गतीने हे दाखले उपलब्ध करून दिले आहेत. १ जून ते २० जुलै दरम्यान वितरीत करण्यात आलेली ऑनलाईन प्रमाणपत्रे:
१ उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate) २,६४४
| २ | रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) ६५
| ३ | वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Age & Nationality) १,०७९
| ४ | शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र (Farmer Certificate) ४०
| ५ | आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS) ५९
| ६ | पत / हैसियत दाखला (Solvency Certificate) १३
| ७ | नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer) १,३२९
| ८ | जात प्रमाणपत्र (Caste Certificate) | १,१७९ |
एकूण सर्व प्रकारची ऑनलाईन प्रमाणपत्रे ५,४०९ |

प्रशासनाचे कौतुक व विशेष माहिती:
नागरिक आणि विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागू नये, म्हणून नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे व वरिष्ठ लिपिक संजय सोनुणे यांनी सर्व अर्जांचा वेळीच निपटारा केला.
वेळेची व पैशांची बचत: सर्व ऑनलाईन अर्ज वेळेत मंजूर झाल्याने तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातून तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या मारणाऱ्या नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे.

शैक्षणिक प्रवेश सोपे :- जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेयर आणि उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळाल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा मिळाला आहे. महसूल विभागाच्या या तत्पर व लोकाभिमुख कामामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील शालेय विद्यार्थी, शेतकरी वर्ग व समस्त ग्रामस्थांकडून तहसीलदार अजित दिवटे आणि त्यांच्या संपूर्ण महसूल पथकाचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये