ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत अभिजित बारच्या बाजूला जुगार अड्ड्यावर धाड

पोलिसांच्या कारवाईत सहाजण ताब्यात तर एक फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

पोलीस स्टेशन गोंडपिंपरी हद्दीतील शहरातील नामांकित अभिजित बारच्या बाजूला असलेल्या जुन्या घराजवळ काही इसम पैशांवर “५२पत्त्यांचा हारजीत” जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस स्टेशन गोंडपिंपरीचे पोलीस शिपाई सचिन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन छापा टाकण्यात आला. यात एकूण ७ आरोपींविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईने शहरातील जुगाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये शरद सुरज धुडसे (वय ३३ वर्षे, रा. राममंदिर वॉर्ड ), किशोर तुळशीराम झाडे (वय ३५ वर्षे,रा. राममंदिर वॉर्ड ), विष्णू पाटीलबुवा दराडे (वय ३९ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ७), राजेश भारत देवगडे (वय ४२ वर्षे, रा. इंदिरानगर वॉर्ड), निलेश रमेश भटकर (वय ३९ वर्षे, रा. गोंडपिंपरी), सुनील मोरेश्वर कुद्रपवार (वय ३९ वर्षे, रा. गोंडपिंपरी) हे इसम घटनास्थळी जुगार खेळताना आढळून आले तर अमोल बाजीराव कुळमेथे (रा. महादेव वॉर्ड, गोंडपिंपरी ) फरार असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळते आहे.

सदर कारवाईत जुगार खेळणाऱ्यांकडून रोख रक्कम – ३७०० रुपये आणि ५२ पत्त्यांचा एक कॅट – किंमत ३० रुपये असा एकूण ३७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वरील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कलम १२(अ) अन्वये पोलीस स्टेशन गोंडपिंपरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस स्टेशन गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या नेतृत्वाखाली विभागाचे कर्मचारी विलास कोवे, सचिन गायकवाड, प्रशांत नैताम, आकाश गुंजकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये