ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तलाठ्यावर हल्ला करून फरार झालेला आरोपी सिनेस्टाईल पाठलागानंतर जेरबंद 

२०२४ पासून फरार असलेल्या रेती तस्करी प्रकरणातील आरोपीला एलसीबीने केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 रेती वाहतूक प्रकरणात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करून घटनास्थळावरून रेतीची वाहने पळवून नेल्याप्रकरणी सन २०२४ पासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या आदेशानुसार ही कारवाई शनिवारी (१८ जुलै) करण्यात आली.

या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२/२०२४ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील फरार आरोपी धम्मपाल मच्छिंद्र अंभोरे (वय २४, रा. दिग्रस बुद्रुक) याचा शोध घेत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) ओमप्रकाश सावळे, हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे आणि महिला हेड कॉन्स्टेबल वनिता शिंगणे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये