क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांचा सन्मान करून साजरा केला शिक्षक दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा, देऊळगाव राजा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .व शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार वसन्मान करण्यात आला .
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरणभाऊ डोईफोडेहे होते तर प्रमुख उपस्थितीत, उपाध्यक्षा मनीषाताई सरपते , ज्येष्ठ पत्रकार व शिक्षण समिती तज्ञ सुरजभाऊ गुप्ता ,पत्रकार विलास जगताप ॲड. भालचंद्रभाऊ डोईफोडे ॲड. परमेश्वर शेळके , सुदर्शनभाऊ गीते,अमोलभाऊ जाधव,सचिव मुख्याध्यापिका राजमाने मॅडम तसेच समिती सदस्य लताताई बोरकर ,साधनाताई पवार ,अनुराधाताई पवार व सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम अत्यंत आपुलकीचा आणि प्रेरणादायी ठरला.
आजच्या बदलत्या युगामध्ये समाजाचा शिक्षकांकडे आणि विशेषतः सरकारी शाळा व सरकारी शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अशा परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. शिक्षकांच्या पाठीशी समाज आणि पालक उभे राहिले, तर शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा मिळते.शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसतो; तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना जबाबदार, संवेदनशील आणि संस्कारक्षम नागरिक बनविण्याचे महान कार्य शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच देशाची भावी पिढी घडत असते.
सरकारी शाळांमध्ये मर्यादित साधनसामग्री असतानाही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि भावी पिढीच्या निर्मितीचा सन्मान आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने राबविलेला हा अभिनव आणि सकारात्मक उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी भावना यावेळी समिती सदस्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करण्यात आली.
“ज्या समाजात शिक्षकांचा सन्मान होतो, त्या समाजाचे भविष्य उज्ज्वल होते.”
या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते. सन्मान करण्यात आला. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम अत्यंत आपुलकीचा आणि प्रेरणादायी ठरला.
आजच्या बदलत्या युगामध्ये समाजाचा शिक्षकांकडे आणि विशेषतः सरकारी शाळा व सरकारी शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अशा परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. शिक्षकांच्या पाठीशी समाज आणि पालक उभे राहिले, तर शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा मिळते.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा व्यक्ती नसतो; तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा शिल्पकार असतो. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून त्यांना जबाबदार, संवेदनशील आणि संस्कारक्षम नागरिक बनविण्याचे महान कार्य शिक्षक करतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच देशाची भावी पिढी घडत असते.
सरकारी शाळांमध्ये मर्यादित साधनसामग्री असतानाही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून ज्ञान, संस्कार, शिक्षण आणि भावी पिढीच्या निर्मितीचा सन्मान आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने राबविलेला हा अभिनव आणि सकारात्मक उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“ज्या समाजात शिक्षकांचा सन्मान होतो, त्या समाजाचे भविष्य उज्ज्वल होते.”
या प्रसंगी शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यार्थी पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण तज्ञ सुरज गुप्ताव आभार प्रदर्शन गाडगे सर यांनी केले .



