ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैसे दुप्पट करून देण्याचे नावाखाली ‘त्या’ आरोपी महिलेला तीन दिवस पोलीस कोठडी 

लोक अभिरक्षक कार्यालयाने पुरविली मोफत विधी सेवा 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : येथील शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाकामी दि.५ सप्टेंबर रोजी शनिवारी चंद्रपूर जिल्हा न्यायालयात अटकेतील आरोपी महिला विदया विठ्ठलराव निमजे वय ४० वर्षे ,राहणार जोडदेउळ, पठाणपुरा वाॅर्ड, चंद्रपूर यांना चंद्रपूर शहर पोलीसांनी रिमांडकामाकरीता हजर केले होते.

     त्यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाने आरोपी महिलेला मोफत विधी सेवा पुरविली.लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांनी आरोपी महिलेच्या वतीने न्यायालयात वकील पत्र सादर केले.पोलीसांनी आरोपी महिलेची पोलीस कोठडी मिळावी असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.आरोपी महिलेच्यावतीने अॅड विनोद बोरसे यांनी युक्तिवाद करून पोलीस कोठडी मिळणेच्या विनंतीला विरोध केला.गुन्हयाचे गांभीर्य पाहून आणि पोलीसांना तपासाची संधी मिळावी यासाठी न्यायालयाने आरोपी महिलेला तीन दिवस म्हणजेच दिनांक ७ सप्टेंबर सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जिल्हा न्यायालयात आरोपीची बाजू अॅड विनोद बोरसे मांडत आहेत.

   काय आहे प्रकरण?

फिर्यादीस आरोपीने म्हटले की, तुझ्या घरची परिस्थिती बरोबर नाही, तुझ्याकडे पैसे असतील तर मला दे मी एका स्किम मध्ये टाकून डबल करून देते, असे सांगून फिर्यादीची फसवणूक केली, फिर्यादीसह इतर १४ ते १५ लोकांची देखील अटकेतील महिलेने फसवणूक केल्याचा आरोप आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये