ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिनाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सावित्रीबाई फुले विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी थोर शिक्षणतज्ज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिनानिमित्त उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यालयात स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक संजय गाडगे, पर्यवेक्षक तिरुपती बामणे, शिक्षक व विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वर्ग10ची विद्यार्थिनी सुहाना पाटील हिने सूत्रसंचालन , तर नंदनी आर्किलवार हिने प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.

स्वयंशासन दिनांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच शालेय प्रशासनाची भूमिका पार पाडत विविध वर्गांमध्ये अध्यापन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या जबाबदारीचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच नेतृत्वगुण, आत्मविश्वास, शिस्त व जबाबदारीची जाणीव वृद्धिंगत झाली.

उपक्रमास मुख्याध्यापक संजय गाडगे व पर्यवेक्षक तिरुपती बामणे यांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक प्रमुख जीवन आडे , गजानन बोबडे, चंद्रभान किन्नाके, , सुषमा शेंडे, माधुरी उंमरे, भालचंद्र कोगंरे, बाळकृष्ण मरस्कोले सिताराम आत्राम, शंकर गाडे, गिरीश वाव्हळ, लीलाधर मत्ते, प्रियंका उरकुडे, संकल्प भसारकर, शशिकांत चन्ने, प्रभाकर पुंजेकर व सिताराम पिंपळशेंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये