ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोराड येथे ऑटोचा टायर फुटल्याने अपघात

महिला गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : सेलू–हिंगणी मार्गावरील घोराड येथील सेवालाल महाराज मंदिरासमोर भरधाव प्रवासी ऑटोचा समोरील टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात हिंगणी येथील सौ. सुरेखा संजय अवचट (वय ४४) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलूहून हिंगणीकडे जाणारी ऑटो (क्र. MH-31-CV-7369) भरधाव वेगाने जात असताना समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऑटो रस्त्यावर पलटी झाला. अपघातावेळी सौ. सुरेखा अवचट या ऑटोखाली दबल्या गेल्या.

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत ऑटोखालून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर दुसऱ्या वाहनाच्या मदतीने त्यांना सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर कमरेला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले.

या अपघातामुळे काही काळ सेलू–हिंगणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेला वेळेत उपचार मिळाल्याने पुढील वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये