ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवून व दारूच्या नशेत वाहन चालविणा-या 1 टुव्हीलर चालक व 1ऑटो चालक असे 2 वाहन जप्त करून त्यांचेवर कार्यवाही

विलास पाटील पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा व अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ ॲनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 30/06/2026 नाकेबंदी, विशेष मोहीम राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 30/06/2026 रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्यान पोलीस सफौ 443 / अनिल तिवारी, पोहवा / 1265 मुकेश राऊत, पोहवा / 1492 चंद्रकांत तपासे, पोशि / 163 दिलीप कामडी यांनी इतवारा चौक येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक कमांक MH 32 S 5938 दुव्हिलर चा चालक नामे कवडूजी यादवराव धुर्वे वय 44 वर्ष रा. भांडेकर ले आऊट सिंदी मेघे वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ ॲनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 114.1 mg टक्के अल्कहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. तसेच 2) वाहन चालक कमांक MH 32 AK 2587 ऑटो चालक नामे पंकज सुरेशराव भोयर वय 34 वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ गाडेनगर म्हसाळा वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ ॲनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 379.7 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह च्या एकुण 165 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 59 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 2438 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66(1)/192(अ) एकुण 102 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा शहर पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, विलास पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक विलास पाटील, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये