ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध्यरित्या विदेशी दारुची विक्री व वाहतुक करण्याऱ्यावर देवळी पोलीसांची धडक कार्यवाही

संदीप कापडे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन देवळी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कार्यवाही 1 लाख 1 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने जिल्हामध्ये मद्याची विक्री, वाहतुक व साठा करण्यास कायद्याने प्रतिबंध आहे असे असतांना अवैध्य रित्या विदेशी मद्याची वाहतुक करुन विक्री करीत असल्याची गोपणीय माहीती पोलीस स्टेशन देवळी चे पथकास प्राप्त झाली. प्राप्त माहीतीच्या आधारे दिनांक 27/06/2026 रोजी 17/30 वा. ते 18/00 वा. दरम्यान कुंभारपुरा वार्ड क्र.08 देवळी येथे सापळा रचुन संशयीत वाहणाची / व्यक्तीची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान होंन्डा एक्टीव्हा क्र. एम.एच.40 बी.ए.4499 या वाहनाचे पायदानवर विदेशी मद्याची विविध बाटल्या/बाँक्स आढळुन आले. संबधीत व्यक्तीकडे मद्य वाहतुक व विक्री संदर्भातील कोणतेही वैदय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

सदर कार्यवाही दरम्यान आरोपी क्र.1) महेश अरुणराव खांडेकर वय 36 वर्ष 2) नितीन अरुणराव खांडेकर वय 30 वर्ष दोन्ही रा. कुंभारपुरा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

4) 180 एम.एल. राँयल स्टाँग कंपनीच्या विदेशी मद्याच्या 48 बाँटल्या / एक बाँक्स किंमत 16,800/-रु.

5) 500 एम.एल. हायवर्ड 5000 कंपनीचे बियरचे 24 टीन कैन / एक बॉक्स किंमत 8,400/-रु.

6) वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले हॉन्डा एक्टीव्हा क्र. एम.एच.40 बी.ए.4499 किंमत 76,000/-रु. एकुण जप्त मुद्देमाल किंमत 1,01,200/-रुपये चा माल

या प्रकरणी आरोपी विरुध्द देवळी पोलीस स्टेशन येथे दारुबंदी कायदा तसेच लागु असलेल्या इतर कायदया नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही श्री सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा व श्रीमती वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांच्या पर्यवेक्षणाखाली ठाणेदार श्री संदीप कापडे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन देवळी यांचे निर्देशाप्रमाने पोलीस हवालदार नितीन तोडासे, रितेश शर्मा पोलीस अंमलदार सागर पवार, श्याम गावनेर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

पोलीसांचे नागरीकांना आहवान

वर्धा जिल्हा दारुबंदी असल्याने कोणत्याही प्रकारे अवैध्य मद्याची वाहतुक, विक्री किंवा साठा करणे हा दंडणीय गुन्हा आहे. अश्या प्रकारची कोणतीही माहीती नागरीकांना मिळाल्यास त्यांनी तात्काळ जवळचे पोलीस स्टेशनशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा माहीती देण्याऱ्याची ओळख गोपणीय ठेवण्यात येईल..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये