पोलीस अधिक्षकांच्या कठोर निर्देशांना यश
स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस ठाणे वर्धा शहर (गुन्हे प्रगटीकरण पथक), तसेच अन्न व औषधी विभागाची संयुक्त कामगीरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विकी करणाऱ्या एकास आरोपीस अटक
पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा यांच्या आदेशाने वर्धा शहरात प्रतीबंधीत गुटखा, सुगंधीत तंबाखु, तंबाखुजन्य पदार्थ बाळगणारे व विकी करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेशावरून दिनांक 22.06.2026 रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून भारतीय न्याय संहीता तसेच अन्न सुरक्षा आणी मानके अधिनीयम कायदयातील तरतुदीनुसार शेख इम्राण शेख सुलतान उर्फ सोनु सुपारीवाला रा. भामटीपुरा, वर्धा याचे ताज किराणा दुकानावर छापा घातला असता आरोपी नामे शेख इम्राण शेख सुलतान याचे ताब्यात असलेल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणावरील गोडाउनमध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु तसेच तंबाखु जन्य पदार्थाची अवैध्य विक्रीकरीता साठवणुक केल्याचे उघडकीस आल्याने अन्न व औषधी विभागाला प्राचारण करून त्यांचे मार्फतीने वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधीत तंबाखु, पानमसाला, व तंबाखुजन्य पदार्थ इत्यादी असा एकुण 12,29,872 रू (बारा लाख एकोनतीस हजार आठशे बाहात्तर) चा माल जप्त करून आरोपी विरूद्ध गुन्हा नोंद केला.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पोलीस निरिक्षक श्री विलास पाटील, प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्री रविराज धाबर्डे व त्यांचे सहकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आशिषसिंग ठाकुर, व पोलिस स्टेशन वर्धा (शहर) गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.नि. शरद गायकवाड, पो. अंमलदार गजेंद्र धर्म, विवेक बन्सोड, प्रशांत वंजारी, नितीन इटकरे, नरेंद्र कांबळे, श्रावण पवार, अमोल ढोबाले व ईतर यांनी केली. त्यामुळे शहर परीसरात अवैध्य सुंगधीत तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले. अटक केलेल्या आरोपीविरूद्ध यापुर्वीसुद्धा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे नोंद असल्याचे पोलीस सुत्राकडुन माहीती मिळाली.



