वारंवार विद्युत पुरवठा खंडित, व कमी व्होल्टेजमुळे कोरपनावासी त्रस्त
कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ व 11मध्ये कमी व्होल्टेजची समस्या गंभीर बनली असून घरगुती व व्यावसायिक कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरण प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कोरपना शहराध्यक्ष अमोल आसेकर यांनी कार्यकारी अभियंता तेलंग साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनाद्वारे कोरपना शहरातील वारंवार होणाऱ्या वीज खंडितीच्या समस्या थांबविणे, प्रभाग क्रमांक १, २ व ३.11. मधील कमी व्होल्टेजची समस्या तातडीने सोडविणे ,तसेच नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी समस्येची दखल घेत लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
याप्रसंगी गडचांदूर येथील उपविभागीय अभियंता, रोशन तिरसुडे कनिष्ठ अभियंता टोंगे उपस्थित होते..



