जिल्हास्तरीय SIR समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
मतदारांच्या हक्काच्या संरक्षणासाठी चंद्रपूर काँग्रेस सज्ज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर जिल्हा SIR समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक यंग रेस्टॉरंट, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर येथे काँग्रेसचे जिल्हा SIR समन्वय समिती चे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष माजी आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत जिल्ह्यातील विशेष पुनर्निरीक्षण अभियानाची सद्यस्थिती, बूथस्तरावरील कामकाज, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी समन्वय समितीच्या सदस्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिवाराव पोलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, माजी आमदार देवराव भांडेकर, प्रदेश काँग्रेस पदाधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, विनोद दत्तात्रय, प्रदेश सचिव बंडूजी धोतरे, डॉ. दिलीप कांबळे, प्रेरणा गौर, बी. एल ए. – १ तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, विजयकुमार घरत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, युवक शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कुंदा जेनेकर, जिल्हा शहर काँग्रेसच्या अध्यक्षा नगरसेविका चंदा वैरागडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सपाक शेख, शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष रितेश तिवारी, अंबिकाप्रसाद दवे, माजी सभापती दिनेश चोखारे, अनुसूचित जमाती विभाग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर, नगरसेवक सचिन कत्याल, विनोद लहामगे, वसंत देशमुख, मनीष तिवारी, गुरू गुरनुले, विजय तुमाने, बाळू चांदेकर, ऋचित दवे, यश दत्तात्रय, उमेश गोणेलवार, सचिन उपरे, रामकृष्ण कोंडरा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा व मतदान केंद्र स्तरावर अभियान अधिक व्यापकपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बूथस्तरावर सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



