ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झडशी येथे वीज पडून दुधाळू जर्सी गायीचा मृत्यू; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील झडशी परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाळी वातावरणात अचानक वीज कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका दुधाळू जर्सी गायीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झडशी परिसरात पावसाळी वातावरण होते. दरम्यान, आकाशातून जोराची वीज कडाडली. ही वीज अत्यंत जवळ पडल्याने निर्माण झालेल्या तीव्र विद्युत प्रवाहाचा धक्का बसून संजय कुणघटकर यांच्या मालकीची दुधाळू जर्सी गाय जागीच कोसळली. यात गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत्यूमुखी पडलेली गाय दुधाळू असल्याने संजय कुणघटकर यांचा दुग्धव्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे साधन धोक्यात आले आहे. या घटनेमुळे त्यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तातडीने पंचनामा करून संजय कुणघटकर यांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये