प्रेरणा महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- युगचेतना बहुउद्देशीय संस्था संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय, गडचांदूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अध्यक्ष नामदेव ठेंगणे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एमर्स अकॅडमी चे संचालक नानेश्वर धोटे, बोबडे, बत्तुलवार तसेच जिवतोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रसिद्ध योगप्रशिक्षक डॉ. कुलभूषण मोरे यांनी केले. दैनंदिन धावपळीच्या युगात आरोग्याच्या तक्रारीकडे होणारे दुर्लक्ष यासाठी योगच महत्त्वपूर्ण ठरेल हे डॉक्टर मोरे यांनी उदाहरणासह पटवून दिले.त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे फायदे आणि निरोगी जीवनासाठी योगाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशी आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. छाया गायकवाड यांनी प्रभावीपणे केले. उपस्थितांचे आभार प्रतीक मुन यांनी मानले.विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा . क्रांती कासले, प्रा.पवार,प्रतीक मून, रोहन धाडे आणि अर्चना मुत्तलवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या योग दिन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.



