डि.बी.पथकाची जुगार अड्ड्यावर धाड
चार आरोपींना वर्धा शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सुहास चांदोरे डि.बी.पथकाचे पोलिस हवालदार यांनी केलेली कार्यवाही….
पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वर्धा जिल्हा न्यायालयासमोरील हॉंकर्स प्लाझाच्या बाजूच्या गल्लीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाने धाड टाकून चारही आरोपींना घेतले ताब्यात आरोपी नंबर (1) रंजीत प्रभाकर बगडते वय 48 वर्ष राहणार ज्ञानेश्वर नगर म्हाळसा वर्धा आरोपी नंबर (2)रवि रमेश पाझारे वय 34 वर्ष राहणार आनंदनगर वर्धा आरोपी नंबर (3) शेख रशीद शेख लतीफ वय 40 वर्ष राहणार गाडगे नगर म्हाळसा वर्धा आरोपी नंबर (4) पंकज अशोक लभाणे वय 40 वर्ष राहणार ज्ञानेश्वर नगर म्हाळसा वर्धा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 831/2026 यु/स महाराष्ट्र जुगार ॲक्ट दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलिस हवालदार सुहास चांदोरे व पोलिस कर्मचारी यांनी चार जणांविरुद्ध कारवाई केलेली असून या कारवाईत आरोपी कडून रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण 3,220 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही आरोपी विरुध्द
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 52 पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला असून
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली डि बी पथकाचे पोलिस हवालदार सुहास चांदोरे, सचिन भालशंकर, मनोज काकपुरे व नवनीत वानखेडे यांनी संयुक्तपणे केली. शहर परिसरात अवैध जुगार व्यवसायाविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



