ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धारधार लोखंडी चाकू घेऊन फिरणाऱ्या युवकाला वर्धा डि बी पथकाचे घेतले ताब्यात

पोलिस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाने केलेली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 18 जून 2026 रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर डि बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड व पोलिस कर्मचारी हे पेट्रोलींग करीत असताना आरोपी नामें सुभांशु उर्फ दादू राजू भगत वय 21 वर्ष राहणार इतवारा बाजार तहसील जिल्हा वर्धा हा विसावा चौक वर्धा येथे धारधार लोखंडी चाकू घेऊन दहशत पसरवीत आहे व जोरजोरात ओरडत आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे डि बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड दोन पंचासह आणि पोलिस कर्मचारी यांच्या समक्ष विसावा चौक वर्धा येथे गेले असताना आरोपीची तपासणी करण्यात आली त्यावेळी आरोपीकडे एक धारधार लोखंडी चाकू मिळून आल्याने आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आणून सरकार तर्फे फिर्यादी नामें पोलिस हवालदार अभिजित वाघमारे वय 45 वर्ष बक्कल नंबर 1416 पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी तोंडी रिपोर्ट दिली की एक अज्ञात व्यक्तीने फोनवर बोलताना माहिती दिली की एक अज्ञात इसन विसावा चौक वर्धा येथे धारधार लोखंडी चाकू घेऊन दहशत पसरवीत आहे या करिता पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 810/2026 कलम 4,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली डि बी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड व पोलिस अंमलदार महेन्द्र पाटील अभिजित वाघमारे रंजीत भुरसे अमोल साळवण यांनी केलेली आहे.

सविस्तर या प्रमाणे आहे की पो.स्टे.परीसरात पेट्रोलिंग करित असतांना आम्हास मुखबिर कडुन माहीती मिळाली कि, विसावा चौक , वर्धा येथील सार्वजनिक ठिकानी एक इसम हा त्याचे हातात धारदार चाकु बाळगुन दहशत पसरवित आहे व जोरजोरात ओरडत आहे अशा माहीती वरुन पंच व पो.स्टाँप सह खबरे प्रमाणे विसावा चौक येथे गेलो असता एक इसम सार्वजनिक ठिकानी धुमधाम करीत दिसुन आला त्यास पंचाना दाखवुन पोस्टाँफच्या मदतीने घेराव टाकुन त्यास शिताफितीने ताब्यात घेवुन त्याला निशस्त्र करुन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभांशु उर्फ दादू राजू भगत वय 21 वर्ष रा. इतवारा बाजार वर्धा असे सांगितले वरुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेवुन त्याच्या हातातुन एक लोखंडी धारदार असलेली चाकु मिळुन आल्याने सदर घटनास्थळ मौका जप्ती पंचनामा करुन सदर चाकु पंचासमक्ष जप्त करुन सदर घटने संबंधाने ई-साक्ष अँप मध्ये व्हीडीओ ग्राफी व फोटो ग्राफी घेवुन अपलोड करण्यात आली आहे. सदर इसम हा धारदार लोखंडी चाकु बाळगुन कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे बेतात असल्याने लोखंडी चाकु ताब्यात घेवुन आरोपीसह पोस्टेला परत येवुन आरोपी याचे कृत्य कलम 4, 25 भा.ह.का कायदा अन्वये

हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार महेद्र पाटील, अभिजीत वाघमारे, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये