पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी अवैध्यरित्या मॅफेड्रॉन (एम.डि.) बाळगणाऱ्या एकास अटक
विलास पाटील पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वर्धा शहर यांची मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 20.06.2026 रोजी पोलीसांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून एन.डि.पी.स. कायदयातील तरतुदीनुसार रेड कार्यवाही केली असता आरोपी नामे शेख अमीर शेख हमीद रा. आनंदनगर, वर्धा हा आपले ताब्यात अवैध्यरित्या मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ बाळगुन असतांना मिळुन आल्याने पालीसांनी त्यास अटक केली.व अपराध क्रमांक 827/2026कलम 8क 22ब आणी 29एन.डी. पी.एस ऍक्ट गुन्हा नोंद करण्यात आला हा एम डी. पदार्थ त्याने सदर एमडी अंमलीपदार्थ हा रोशन सहारे रा आनंदनगर, वर्धा याचा असुन त्याचे सांगण्यावरुन विकी करीत असल्याचे सांगितले. दिनांक 20.06.2026 रोजी रात्रीचे सुमारास वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांना नाईट पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून त्यांनी मा. प्रभारी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पंच, मापारी, फॉरेसिंक पथक व पोलीस स्टॉफसह ईदगाह मैदान, वर्धा येथे ट्रॅप लावुन आरोपीचे तपासणी केली असता आरोपीच्या अंगझडतीमध्ये 03.87 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ, अंगझडतीत नगदी रक्कम 1900/- रु व दोन अॅड्रॉईड मोबाईल असा एकुण जु.कि. 51,350 रू चा मुद्देमाल जप्त केला. हि कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री सौरभ अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशीव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, प्रशांत वंजारी, महेद्र पाटील, अभिजीत वाघमारे, नितीन ईटकरे, श्रावण पवार, वैभव जाधव, रंजीत भुरसे, अमोल साळवन यांनी केली. त्यामुळे शहर परीसरात अवैध्य मॅफेड्रॉन (एम.डि) अमली पदार्थ विक्रीवर प्रतीबंध करण्यास पोलीसांना यश मिळाले. गुन्हयात अटक केलेल्या आरोपीवर यापुर्वी सुद्धा वेगवेगळ्या कलमाअन्वये भरपुर गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती मिळाली आहे



