ताज्या घडामोडी

चंदनखेडा ग्रामसेवक नाईकवार यांना तत्काळ निलंबित करा – सुमीत हस्तक

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

            वरोरा – भद्रावती विधानसभेच्या आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांची आम आदमी पार्टी भद्रावतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. भद्रावती तालुक्यात सांसद आदर्श ग्रामपंचायत व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे दत्तक गाव म्हणून चंदनखेडा हे गाव ओळखल्या जाते. या ग्रामपंचायत मधे श्री. किशोर नाईकवार हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. दिनांक 25 जुलै 2023 रोजी ग्रामसेवक किशोर नाईकवार व ग्रामपंचायत मधले कर्मचारी वर्ग हे ग्रामपंचायत कार्यालय मधे एका खोलीत खुलेआम मध्यपान सेवन करताना आढळले. या ग्रामसेवक चे सर्वत्र तालुक्यात बोंबाबोंब सुद्धा झाली.

तरी आतापर्यंत यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही. तरी या विषयावर गंभीरतेने दखल घेऊन चंदनखेडा चे ग्रामसेवक नाईकवार यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी केली. विषयाला गांभीर्याने लक्षात घेत चंदनखेडा या गावातील ग्रामसेवकाला निलंबित करू असे आश्वासन आमदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले. यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे, चंदणखेडा चे विकी मुळेवार, शुभम भोसकर, आशिष बारतीने, गौरव चांदेकर, दिलीप कापकर, अनिल कोकुडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये