ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन रामनगर वर्धा डिबी पथकाची धडक कारवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 13 जून 2026 रोजी गजानन नगर वर्धा येथे खरबीदाराकडून गुप्त माहिती मिळाली कि अतुल मुंगले यांच्या राहते घरी अवैधरित्या दारू विक्री धंदा सुरू आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन रामनगर वर्धा चे डी बी पथकाचे सहाय्यक पोलिस फौजदार राजेश साहू व पोलिस कर्मचारी सुरज राठोड भुषण दांडेकर यांनी अतुल शेषराव मुंगले यांच्या घरांची झडती घेतली असताना त्याच्या घरातून रॉयल स्टंग कंपनीच्या 180 एम एल च्या 12 निपा मिळून आल्याने आरोपी वर पोलिस स्टेशन रामनगर वर्धा येथे अपराध क्रमांक 569/2026 कलम 65 (ई)77(अ,) गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर वर्धाचे प्रभारी ठाणेदार संतोष ताले सहाय्यक पोलिस फौजदार राजेश साहू आम्ही पो.शि. सुरज राठोड पोलिस शिपाई भुषण राठोड यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये