ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कचरा संकलनास मनपाची पर्यायी व्यवस्था

मोटराइज्ड घंटागाडीतच कचरा देण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट

मनपा स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कचरा संकलन व्यवस्थेत त्रुटी राहू नये व नागरिकांना कचरा देण्यास कुठल्याही स्वरूपाची अडचण निर्माण होऊ नये यादृष्टीने चंद्र्पुर महानगरपालिकेतर्फे कचरा संकलनासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली गेली असुन नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा मोटराइज्ड घंटागाडीतच देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

     कुठल्याही स्वरूपाच्या कामबंद आंदोलनामुळे त्या विभागाच्या रोजच्या कामात अडथळा निर्माण होतो आणि कचरा संकलनाचे काम हे तर सर्वात महत्वाचे काम आहे. चंद्रपूर शहरात आजघडीला रोज अंदाजे १०० टनच्या वर कचरा निर्माण होतो, हा कचरा जर रोज संकलित झाला नाही तर शहराच्या प्रत्येक लहान मोठ्या चौकात कचऱ्याचे ढीग आढळुन येतील व स्वच्छता,आरोग्याच्या दृष्टीने मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

    त्यामुळे या संभावित प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता मनपाद्वारे पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असुन नागरिकांनी रोज निर्माण होणार कचरा हा इतरत्र कुठेही न टाकता मोटराइज्ड घंटागाडीमार्फतच देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये