ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्लक्षित समुदायासाठी दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सकडून टेलिमेडिसीन सेवेला सुरुवात

चांदा ब्लास्ट

नागपूर – दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने अलिकडेच दुर्लक्षित समुदायांसाठी सर्वसमावेशक निरोगीपणा कार्यक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डॉक्टर, फिटनेस उत्साही, आणि कोरोना विषाणू संक्रमणावर मात केलेल्यांच्या आरोग्यासाठी रुग्णालयाने टेलिमेडिसीन सेवा सुरू केली आहे. आयएमएएस हेल्थकेअर आणि क्लीव्हलँड क्लिनिकच्या सहकार्याने या सेवेला प्रारंभ झाला आहे. नागपूर भेटीवर आलेले क्लीव्हलँड क्लिनिकचे पल्मोनरी क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. अखिल बिंद्रा, दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक डॉ. अनुप मरार, तसेच कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

डॉ. अखिल बिंद्रा यांनी सांगितले की, “भारतासारख्या देशात, विशेषत: साथीच्या आजारानंतर आरोग्यसेवा सुलभ करण्यासाठी टेलिमेडिसीन महत्त्वाची भूमिका बजावेल. कोरोना लसीकरणानंतर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची प्रक्रिया अधिक बळकट होईल. क्षयरोग आणि एच 1 एन 1 यांसारखे आजार भविष्यात आरोग्यसेवेपुढील आव्हान ठरतील, आणि टेलिमेडिसीन या आजारांच्या प्रतिबंधात्मक काळजीसाठी उपयोगी ठरेल.”

आयएमएएस हेल्थकेअरच्या संस्थापक दीपिका ग्रांधी यांनी यावेळी नमूद केले की, “या टेलिमेडिसीन सेंटरमुळे नागपूरकरांना जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याची स्थिती गंभीर होण्याआधीच आजार व्यवस्थापनासाठी सक्रिय दृष्टीकोन ठेवता येईल.”

रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी म्हटले की, “हे केंद्र नागपूर आणि जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तज्ज्ञांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. टेलिमेडिसीनच्या माध्यमातून प्रगत आरोग्यसेवा रुग्णांच्या घराजवळ आणली जाईल, ज्यामुळे प्रतिबंधात्मक काळजी आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल.”

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये