ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा यात्रेत गुंड प्रवृत्तीच्या तरुणांच्या चाकू हल्ल्यात विद्यार्थी जखमी.

कायदा व सुव्यवस्थेला खेळ समजणाऱ्या गावगुंडा वर कठोर कार्यवाहीची मागणी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात सध्या बालाजी महाराजांची यात्रा सुरू असून यात्रेत बाहेरगावातील व गावातील लोकांची गर्दी वाढत आहे.

पण याच गर्दिचा गैरफायदा घेत यात्रेत दारू पिउन येऊन महिलांची, मुलींची छेड काढत, चोरी, मारामारी करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

यात्रेत अश्या घटना होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा कार्यरत असतांना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेला न जुमानता गावातीलच काही गावगुंड बिनधास्त वागत आहेत.

अशीच घटना दिनांक ५ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली.

सविस्तर असे की, विवेकानंद नगर वॉर्ड क्रमांक २ येथे राहणारा व बी एस सी ऍग्री ला प्रथम वर्षाला असणारा प्रतीक प्रविणकुमार काकडे हा विद्यार्थी त्याच्या आई, भाऊ, मावशी या परिवारा सोबत यात्रेत गेला होता.

पावभाजी खाऊन मोठ्या भावाला घरी सोडून तो यात्रेत त्याच्या आईला व मावशीला आणण्यासाठी परत गेला असता

यात्रेतील बाजार गल्लीत काही दारू पिऊन धिंगाणा घालत येणाऱ्या गावगुंड प्रवृत्ती असलेल्या भावेश दिलीप कासारे , विशाल शेळके, निलेश खरात यांनी चालता चालता त्यांनी कारण नसतांना प्रतीक च्या डोक्यात जोरदार चापट मारली,

त्यामुळे प्रतीक ने मला का मारले याची विचारणा कासारे याला केली असता त्याने लगेच जवळच असलेल्या पाणीपुरी गाडी वरचा कांदे कापण्याचा चाकू घेऊन प्रतीक वर वार केले,

परन्तु त्याने मानेवर केलेला वाराचा बचाव करण्यासाठी प्रतीक ने डावा हात वर केल्याने चाकूचा वार मानेवर न लागता डाव्या हाताच्या करंगळी ला लागून खोलवर जखम होऊन रक्ताची धार लागल्याने प्रतीक ने जोरदार ओरड केली,

मुलाची ओरड ऐकताच त्याची आई व मावशी ने तेथे धाव घेतल्याने या तिघांनी तेथून गर्दिचा फायदा घेत पळ काढला.

बोटाचे रक्त थांबत नसल्याने त्याला समोरच्याच दवाखान्यात नेऊन त्याला डॉक्टर यांनी धाव खोलवर असल्याने सहा ते सात टाके देऊन उपचार केला.

त्यामुळे प्रतीक व त्याच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेली तोंडी आपबीती सांगितल्याने प्रतीक च्या तोंडी सांगण्यावरून पोलिसांनी रिपोर्ट दाखल करून भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 118(1), 351 (2), 3(5),

अश्या विविध कलमा नुसार

भावेश दिलीप कासारे राहणार जुना जालना रोड देऊळगाव राजा, विशाल शेळके राहणार अमृत नगर देऊळगाव राजा व निलेश शिवाजी खरात राहणार त्रंबकनगर देऊळगाव राजा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जमादार , तपासाधिकारी विनोद गवई करीत आहेत.

या घटनेमुळे यात्रेत आपल्या परिवारसोब येणाऱ्या विद्यार्थ्यां व मुलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.

 या गुन्ह्यातील निलेश शिवाजी खरात राहणार त्रंबक नगर यांच्यावर पहिलाच बलात्काराचा गुन्हा दाखल असून त्याने काही महिने जेलची हवा सुद्धा चाखली आहे.

असे असताना आता पोलीस कोणत्या पद्धतीने अश्या गावगुंडाच्या मुसक्या आवळते हा देऊळगाव राजा नगरीतील लोकांचा प्रश्न आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये