डॉ.थानेश्वर कायरकर यांची “महाराष्ट्र भुषण पुरस्कार-२०२६” साठी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ थानेश्वर कायरकर हे करीत असलेल्या उल्लेखनीय, प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापणेचा प्रवाह भक्कम होऊन सखोल मानवीय अंतर्मनाचा चेहरा प्रफुल्लीत सन्मुख होतो. डॉ.थानेश्वर कायरकर कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच शिवाय त्यांच्या हातून होत असलेली राष्ट्रसेवा हि खरोखरच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे.
कष्टाची जाणीव व सत्याची कास धरून चालतांना त्यांच्याकडे पाहिले की कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नव्याने येवू पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळते. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कसे असावे याचा उत्तम उदाहरण त्यांच्या कडे पाहिले की लक्षात येत. त्यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपल्याने महाराष्ट्रातील अनेक कार्यक्षेत्रात दिलेल्या बहुमुल्य योगदानाबद्दल तसेच कर्तृवाबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सन्मान परीषदेने “ग्रामीण विकास, सहकार, सामाजिक सेवा व लोकनेतृत्व क्षेत्रातील” उल्लेखनीय योगदानाबद्दल *”महाराष्ट्र भुषण पुरस्कार-२०२६”* साठी निवड केली असून लवकरच *लोकशाहीर अन्नाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे* येथे सन्मानित करण्यात येणार आहे.



