ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांनी धाड टाकून 4 लाख 35 हजारांचा दारूसाठा केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पुणे येथे झालेल्या विषारी दारुकांडामुळे अनेक जणांना प्राणास मुकावे लागलेले आहेत. या पाश्वभुमिवर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री. डॉ राजेश देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अवैध गावठी दारु तसेच बनावट मद्य निर्मिती संपूर्ण नायनाट करण्याकरीता सक्तीचे निर्देश दिलेले आहेत. सदरील आदेशास अनुसरुन विभागीय उपआयुक्त नागपूर विभाग नागपूर श्री. गणेश पाटील, तसेच वर्धा जिल्हयाचे अधीक्षक श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दिनांक 29/05/2026 पासून आजतागायत वर्धा जिल्हयात गावठी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच बनावट मद्य निर्मिती विरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

श्री. एम. ए. शेख, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक यांच्या पथकाने कारवाई करत एकूण 20 गुन्हे नोंदविले असून 10 आरोपीस अटक करून अवैध दारु निर्मिती करीता वापरण्यात येणारे रसायन 10,180 लि., विदेशी दारु 08 लि., तसेच गावठी दारु 192 लि. असा एकूण. 4,35,152/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याकामी श्री एम.ए.शेख निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा तसेच दुय्यम निरीक्षक श्री. डी. वाय. राऊत, दुय्यम निरीक्षक श्री. आर. यु. काष्टे व जवान सर्वश्री अमित नागमोते, योगेश गावंडे, गिरीष बावणे, सुजाता भारस्करे यांनी मदत केली. तसेच अशा अवैध दारु धंदयाची कोणास माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा या कार्यालयास अवगत करावे असे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये