ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात 200 मिटर अंतराचे आत खाजगी प्रवासी वाहतूक करणेस खाजगी वाहने उभी करणेस वाहन चालकाना प्रतिबंध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरात व जिल्ह्यातील बरेच बसस्थानक येथे खाजगी वाहन चालक हे मोठ्या प्रमानावर खाजगी वाहने हे बसस्थानक परिसरात उभी करत असतात त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमानावर कोंडी ही होत असते व ट्रॅफिक जाम होत असते, तसेच अवैधरित्या प्रवासी वाहतूक ही होत असते, ST च्या वाहतुकीवर ही याचा परिणाम हा होत असतो त्यामुळे आज रोजी मा पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी वाहतूक पोलिसांना आदेश दिलेत कि बसस्थानक परिसरात 200 मिटर च्या आत खाजगी वाहतुकीस प्रतिबंध करावे, अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालावे, बस स्थानक च्या इन्ट्री गेट व आउट गेटवर 2 ट्रॅफिक अंमलदार दररोज नेमावे. वाहतुकीची कोंडी होवू देवू नये,

त्यावरून वाहतूक पोलिसांनी आज रोजी बसस्थानक b जवळ 200 मिटरच्या आत उभे असणारे ट्रेव्हेलंस, खाजगी वाहने यांच्यावर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अन्वये

38 लकझरी वाहनावर कार्यवाही करीत 46000 हजार रुपयांचा दंड ही वसूल केलेला आहे, तसेच तेथील लकझरी बस चालक यांची मिटिंग घेवून त्यांना ही बसस्थानक परिसरात खाजगी वाहने उभी करू नयेत, खाजगी अवैध प्रवासी वाहतूक करू नये याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्यात, याबाबत सूचना फलक ही बसस्थानक येथे लावन्यात आलेले नाहीत.

सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे याबाबत वाहतूक शाखा यांनी अवाहन केलेले आहे,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये