ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी सिकंदर शेख यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सिकंदर शेख यांची भाजपा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सिकंदर शेख हे पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, तसेच आगामी काळात पक्षाच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार आणि जनसंपर्क अभियानांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

सिकंदर शेख यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये