ताज्या घडामोडी

वर्धा जिल्ह्यामध्ये दुचाकी चालकांचे अपघातांमध्ये सातत्याने वाढ

याबाबत वाहतुक शाखेतर्फे जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हामध्ये दुचाकी चालकांचे अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातही अल्पवयीन मुलामुलींकडून जिल्ह्यातील शहरांमध्ये विनापरवाना चालविण्यात येणारी वाहने त्यामुळे होणारे अपघात यामुळे नागरीकांचे जिवीतास तसेच अल्पवयीन मुलामुलींचे जिवीतास धोका निर्माण झाला आहे. पालक आपले अल्पवयीन पाल्यांना बाहने चालविण्यास देतात. शाळा तसेच कोचींग क्लासला जाताना जास्तीत जास्त अल्पवयीन बालके हे वाहने चालवितांना निदर्शनास येत होती. मुलांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्यांना दुचाकी चारचाकी वाहन चालविण्यास देऊ नये. अल्पवयीन मुलांना वाहन देणे त्यांच्या तसेच इतर नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरु शकते. अल्पवयीन मुलाने किंवा मुलीने वाहन चालविल्यास पाल्यावर व पालकांवर सुध्दा कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल याबाबत वाहतुक शाखेतर्फे जनजागृती करण्यात आलेली होती. तसेच जिल्ह्यातील वाहन चालकांना वाहतुकिचे नियमांचे पालन करण्याबाबत अवाहन देखील करण्यात आलेले होते.

मागील ऑगस्ट महिण्यात जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेमार्फत जिल्ह्यात वाहतुक नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जास्त चलान केसेस या अल्पवयीन बालकांवर व त्यांचे पालकांवर करण्यात आलेल्या आहेत.

1) अल्पवयीन मुलांवर विना लायसन्स वाहन चालविणे एकुण 94 केसेस 4,70,000/- दंड रक्कम

2) अल्पवयीन मुलांचे पालक व वाहनाचे मालक एकुण 298 केसेस 4,70,000/- दंड रक्कम

3) विना लायसन्स वाहन चालक एकुण 731 केसेस 36,55,000/- दंड रक्कम

4) दारु पिवुन वाहन चालविणारे वाहन चालकांवर ऑगस्ट मधिल केसेस 32 (जाने ते ऑगस्ट 370)

5) ऑगस्ट महिण्यातील एकुण केसेस – 9,100

6) रस्त्यावर वाहतुकिस अडथळा निर्माण करणारे हातबंडी, आस्थापना यांचेवर चलान -35

7) वाहतुक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचे लायसन्स निलंबन 134 माहे ऑगस्ट महिण्यात विशेष मोहीम राबवून वाहतुकिचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात आलेली असुन त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट, वाहतुकिस अडथळा, ट्रिपल सिट, वाहन चालवितांना मोबाईल चा वापर, सिट बेल्ट, विना नंबर प्लेट अशा एकुण 9,100 ई चलान केसेस करण्यात आलेल्या असुन त्यांची एकुण 1,09,14,150/- दंड करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई मा. सौरभकुमार अग्रवाल साहेब, पोलीस अधीक्षक, मा. सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि विजयकुमार घुले, पो.उप.नि. अमोल लगड, अश्विन गजभिये, जावेद शेख, राजेश कंगाले व वाहतुक पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

करीता वर्धा जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अल्पवयीन पाल्यांना कोणत्याही परीस्थितीत वाहने चालविण्यास देऊ नये. वाहतुक शाखेकडून वर्धा शहरामध्ये विविध ठिकाणी विशेष मोहीम हाती घेऊन अल्पवयीन वाहन चालकांवर विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर तसेच वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

रस्ते अपघातातील जिवीत हाणी कमी करण्यासाठी जिल्हा वाहतुक शाखेकडून अशाच प्रकारची मोहीम मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा. यांचे मार्गदशनात यापुढेही प्रभावी पणे राबविण्यात येणार आहे. तरी वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागाकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे कि आपले वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये