राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना “भारतरत्न” सन्मान देण्याची मागणी
श्रीगुरुदेव सेवा मंडळ तालुका गोंडपिपरी कडून निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
भारत देशाला अध्यात्म, स्वच्छता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अद्याप भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान “भारतरत्न” मरनोत्तर प्रदान करण्यात यावा अशा मागणीकरीता तालुक्यातील शेकडो श्रीगुरुदेव सेवक, प्रचारकानी तहसिल कार्यालय गाठले व प्रशासनाला मागणीचे निवेदन सादर केले.
या मागणीसाठी गोंडपिपरी तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक, कार्यकर्ते मंडळीनी ऑगस्ट क्रांती पर्वाचे औचित्य साधले. ज्या राष्ट्रसंतानी सर्वधर्मसमभावाची वागणूक दिली, समाजातील अनिष्ट रुढी परंपरेला बगल देत अंधश्रद्धा दूर केली आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले. त्या राष्ट्रसंताच्या कार्याच्या गौरव करण्यासाठी त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी कित्येक वर्षापासून होत आहे. मात्र याकडे सरकारचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी मंडळीनी ऑगस्ट क्रांतीपर्वाचे औचित्य साधून उपविभागीय अधिकारी संजय जाधव, तहसीलदार शुभम बहाकर, नायब तहसीलदार चांदेकर यांना तालुकासेवाधिकारी विश्वास सूर, उपसेवाधिकारी बाबाजी लेडांगे, तालुका निबंधस्पर्धा प्रमुख उमेश कडू, प्रचारप्रमुख दिवाकर मंडरे, सचिव मुन्ना चुधरी, सुरेद्र चोथले, पांडुरंग भगत, शंकर नेवारे, जीवनदास रासपल्ले, शंकर पाल, सुनंदा राऊत, कल्पना निखाडे मधुकर मोरे, मंदाताई ताडशेटीवर यांच्यासह गोंडपिपरी तालुक्यातील असंख्य मंडळीच्या उपस्थितीत गोंडपिपरी तालुक्याच्या मार्फत नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार, अमित शहा गृहमंत्री भारत सरकार, नितीन गडकरी मंत्री भारत सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.
त्याप्रसंगी गोंडपिपरी येथे वंदनीय तुकडोजी महाराजांचे गाणे, भारत माता की जय, भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे असा जयघोष करण्यात आला. ग्रामगिता व निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कडू तोहोगाव व उपस्थिततांचे आभार विस्वास सूर तालुका सेवाधिकारी यांनी मानले



