ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकपदी निवड झालेल्या १३ गुणवंतांचा सत्कार

_शिक्षक दिनाचे औचित्य साधून डी.एड. महाविद्यालयात गौरव सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील १३ गुणवंत तरुण-तरुणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीत घवघवीत यश संपादन केले. या सर्वांची दलित मित्र मी. तू. नागापुरे अध्यापक विद्यालय, गोंडपिपरी येथून डी.एड.चे शिक्षण झाले असल्याने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी त्यांचा शाल, रोपटे व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षकपदी नियुक्ती झालेल्या धीरज पुलगमकार, उज्वला बामनकर, समीर आवारी, रितिक पोटे, सुप्रिया पुलगमकार, पल्लवी कोल्हे, अश्विनी ढवस, अश्विनी येलमुले, स्नेहल हिवरकर, सोनी धानोरकर, सचिन मेंगरे व कुमारी ढोक यांच्यासह एकूण १३ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. ग्रामीण व सामान्य परिस्थितीतून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या बळावर शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख वरुण वासाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव भोंगळे, गटशिक्षण अधिकारी दामिनी महाजन, प्राचार्य माधुरी सरोदे यांच्यासह प्राध्यापक अविनाश वासाडे, विवेक बोडे, विलास खामनकर, स्वाती कारडवार, कमल हिरादेवे, प्रदीप बामनकर, आलोक खोब्रागडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप गजभिये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदराव झाडे, रणवीर धुडसे, राकेश दुर्गे, भाऊराव गोरकार यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकपदावर मिळविलेले यश ही संस्थेसाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्याची प्रेरणा मिळेल, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये