ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा पोलिस ठाण्यात अनोखा राखीबंधन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पोंभुर्णा यांच्या वतीने पोंभुर्णा पोलिस ठाण्यात अनोखा राखीबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून महिला भगिनींनी पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा संदेश दिला.

समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना राखी बांधली आणि सुरक्षित, निरोगी व यशस्वी सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाचा हा उपक्रम भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला.

यावेळी पोंभुर्णा पोलिस ठाण्याचे ठाणेदार राहुल ठेंगणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, भाजपा तालुकाध्यक्ष हरीश ढवस, वैशाली बोलमवार, नगरसेविका नंदा कोटरंगे, उषा गोरंतवार, रोहिणी ढोले, माधुरी मोरे, पपीता तोडसाम, छाया जनगणनवार, पपीता पोलपोलवार, माया कोहळे, माया बुरांडे, शिल्पा नागूलवार, हिना बिश्वास, शीतल लेनगुरे, पुष्पा कुळमेथे आणि चंद्रकला गव्हारे उपस्थित होत्या.

तसेच पोलिस अंमलदार नरेश निमगडे, अरविंद चौधरी, शंकर पिटलेवाड, जगदीश पिपरे, राहुल धुडसे, अंकुश मांदाडे, सुनज आत्राम आणि जगन कोहळे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये