ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाबा गावात बसस्थानकाची निर्मिती करा

युवा नेते नितेश झाडे यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या गावात नवीन बसस्थानक निर्माण करून मार्गांवरून प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाश्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धाबा येथील युवा नेते नितेश झाडे यांनी केली आहे. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.

तेलंगणा सीमेवर असलेला गोंडपिपरी तालुक्यातील धाबा हे सर्वात मोठे व महत्वपूर्ण गाव आहे. गोंडपिपरी वरून तेलंगना चे अंतर फार कमी आहे. यामुळे अनेक प्रवासी गोंडपिपरी वरून धाबा पोडसा हा मार्ग गाठीत तेलंगणात जातात.

धाबा हेच परिसरातील महत्वाचे व मोठे गाव आहे. साधारणत तीस गावांचा थेट संपर्क हा धाबा गावाशी येतो. या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. धाबा व अनेक गावातील प्रवाशी तेलंगणा व गोंडपिपरी येथे विविध कामासाठी येतात. वाहतुकीची मोठी दळनवळण असताना धाबा येथे बसस्थानक नसल्याने प्रवाश्याची मोठी गैरसोय होत आहे.

अनेक वर्षांपूर्वी धाबा पोलीस स्टेशन समोर बसस्थानक होते. ते जीर्ण झाले. तेव्हापासून अजूनही अध्यापही नवीन बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हि महत्वाची समस्या लक्षात घेता तातडीने धाबा येथे बसस्थानकाची निर्मिती करावी अशी मागणी धाबा येथील युवा नेते नितेश झाडे यांनी केली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे झाडे यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये