शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टायगर सेनेची मानवंदना
गोजोली मक्ता जिल्हा परिषद शाळेत सत्कार समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शिक्षण विभागाच्या नुकताच घोषित झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल बारा विद्यार्थी पात्र ठरलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंजोली मक्ता येथील विद्यार्थ्यांचा टायगर सेना आदिवासी विकास संस्थेतर्फे भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आदिवासी टायगर सेनेचे अध्यक्ष गणेश कोवे, तालुका समन्वयक कुंदन पेंदोर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिंदुताई पेंदोर, उपाध्यक्ष विनोद कुंमरे, भावना शेंडे, सुनील सोनुले, किशोर शेडमाके, अनिल शेडमाके, नीतू बोंनगिरवार, कविता कन्नाके, मुख्याध्यापक मुरलीधर सरकार, शिक्षक साधना उराडे, जतिन धोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या अगम्य पेंदोर, कृष्णा मडावी, निल बोनगीरवार, रितू मोहूर्ले, वेद कुंमरे, नंदिनी शेडमाके, रिया शेडमाके, शिवानी आत्राम, सलोनी टेकाम, सारांश शेंडे, नैतिक आत्राम या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी सलोनी चौधरी तर आभार प्रदर्शन हर्षाली सोनुले या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



