ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुनीता खंडाळकर तर जिल्हा संघटकपदी सोनू चौधरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        चंद्रपूर जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी येथील सुनंदा खंडाळकर, सोनू चौधरी यांची जिल्हा संघटक पदी तर तालुका महासचिव श्रुतिका जुनघरे, तालुका सचिव जयश्री बत्तिलवार यांची सर्वानुमते एका बैठकीत निवड करण्यात आली.

 या बैठकीला जिल्हा अध्यक्ष जगदीश जुनघरी, महिला जिल्हाध्यक्ष अनिता बोडे, सुशीला मते, अनिता बोबडे, संगीता टोंगे, तालुकाध्यक्ष किशोर खंडाळकर, अशोक सावरकर, एस राऊत, महेश कांबळे आदींसह मोठ्या संख्येने समता सैनिक कांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या संस्थेच्या माध्यमातून मी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास नविनयुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला .सदर निवडीचे अनेकांकडून अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये