ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनोजे कुनबी समाजा तर्फे विनोद वाढई सन्मानित

धनोजे कुनबी समाज मंदिराचा उपक्रम

चांदा ब्लास्ट

     धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मी नगर चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी समाजातील दहावी बारावी गुणवंत तसेच पी ए डी धारक नेट सेट उत्तीर्ण, फेलोशिप धारक खेळाडू व उपक्रमशील शेतकरी यांचा धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरच्या वतीने सन्मान करण्यात येतो

    यावर्षी समाजातून पीएचडी झालेले विनोद वाढई उपव्यवस्थापक (विवले) यांचा धनोजे कुणबी समाज मंदिर लक्ष्मी नगर चंद्रपूर च्या वतीने पीएचडी धारण केल्याबद्दल राजुरा विधानसभेचे आमदार देवरावजी भोंगडे यांच्या हस्ते व चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मान. प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

     विनोद वाढई हे महावितरण बल्लारशा विभागीय कार्यालयात उपव्यवस्थापक (विवले) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून पीएच डी ची पदवी प्राप्त केलेली असून त्यांच्या संशोधनाचा विषय “चंद्रपूर जिल्ह्यातील सूक्ष्म व मध्यम उद्योगाच्या सर्वांगीण वाढ आणि विकास प्रक्रियेत बँकांच्या योगदानाचे तुलनात्मक विश्लेषणात्मक अध्ययन” हा होता त्यांच्या संशोधन पर प्रबंधास नुकतीच गोंडवाना विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी जाहीर केलेली आहे.त्यांनी शासकीय सेवेची जबाबदारी सांभाळत हे शैक्षणिक यश संपादन केल्याने महावितरण विभागाचे चे नाव उंचावले आहे.

    विनोद वाढई हे महावितरण मध्ये लेखनाची, वाचनाची आवड असलेले व्यसंगी अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत सेवेत राहून ‘विजेची बचत काळाची गरज’,’ सुरक्षितता एक सवय,आधुनिक प्रशासकीय कार्य, संत कार्तिकस्वामी महाराज चपराळा अशा पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

     वाढई हे नोकरी सोबत समाजसेवेचे व्रत अंगीकारलेले कर्मचारी असून त्यांच्या समाजभानांचा गुणगौरव म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१२ मध्ये त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊ त्यांना सन्मानित केलेले आहे.

  त्यांच्या सत्काराबद्दल जगदीप दुधे, धंनजय बोबडे, बबिता बोबडे, सुनीता बोबडे, परीमल वाढई, श्रावस्ती दुधे, माणसं दुधे, आभा वाढई, बापूजी गांधपाडे, लीला बोबडे, अशोक काळे, ममता काळे, ओवी काळे सुधाकर काकडे, नामदेव मोरे व महावितरणचे सर्वं अधिकारी वर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे …..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये