शेतात जाण्यासाठी रस्ता द्या हो : शेतात जाण्याचा मार्ग अडविल्याने शेतकऱ्याचे तहसीलदारांना निवेदन
न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करून सुरज : शाहा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील पुरुषोत्तम कवडू केदार रा. चरुर तह. भद्रावती यांना स्वमालकीच्या शेतात जाण्या येण्याकरीता लगतचे शेतकरी कोसुरकर यांचे शेतातून असलेल्या पूर्वापार रस्त्याचा वापर करावा लागतो.
मात्र सबंधित कोसुरकर या शेतमालकांनी शेतातून जाण्यायेण्यास मनाई केल्याने ऐन हंगामात सबंधित शेतकऱ्याची मोठी पंचायत झाली आहे.
अर्जदार व गैर अर्जदार यांच्यातील वाद थेट तहसील कार्यालय भद्रावती येथे पोहचला असून तहसीलदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दि.०३ मे रोजी शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्राचे युवा लोकसभा सचिव सुरज शहा यांनी सबंधितगरीब कास्तकाराची कैफियत लक्षात घेऊन रस्ता मिळवून देण्यासाठी निवेदन सादर केले.
सबंधित शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.



