ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुर्ला गावात मृदा नमुना संकलन व सोयाबीन बीज उगवण चाचणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आज सुर्ला गावात कृषी विद्यार्थ्यांनी मृदा नमुना संकलन तसेच सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी याविषयी प्रात्यक्षिक आयोजित केले.

कार्यक्रमात शेतकऱ्यांना मृदा नमुना योग्य पद्धतीने कसा घ्यावा, नमुना संकलनाचे महत्त्व आणि मृदा परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष मातीचे नमुने गोळा करून दाखविले.

त्यानंतर सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी गोणपाट (Gunny Bag) पद्धतीने बीज उगवण चाचणी घेण्यात आली. या प्रात्यक्षिकामध्ये ओलसर गोणपाटावर सोयाबीन बियाणे ठेवून त्यांची उगवण कशी तपासावी हे दाखविण्यात आले. पेरणीपूर्वी उगवण चाचणी केल्यास बियाण्यांची गुणवत्ता समजते व योग्य बियाण्यांची निवड करणे सोपे जाते, असे यावेळी सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला व मृदा परीक्षण तसेच बीज उगवण चाचणीबाबत माहिती जाणून घेतली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये वैज्ञानिक शेती पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या दिव्यानी द दारोकार, स्नेहल बोरटकर, कृष्णाली वैरागडे, साक्षी श्रीरामे, साक्षी रेवतकर आणि भक्ती पातोंड यांचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन, सुर्ला गावच्या रावे कार्यक्रम अधिकारी अश्विनी मानकर व कार्यक्रम समन्वयक श्री. आर. व्ही. तायडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये