ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा यांच्या आशीर्वादाने इंजापूर येथे कशिश हॉटेलमध्ये सुरू असलेले दारू अवैध धंदे

कशिश हाॅटेलचा मालकावर कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा तालुक्यातील इंजापूर गावामध्ये कशीश हॉटेलमध्ये अवैध दारू विक्रीचा धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे हे अवैध व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागलेली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दारूबंदी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात वर्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) संजय पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक एम.ऐ.शेख यांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा विभागाने तत्काळ लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनीही या प्रकरणाकडे लक्ष देऊन अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अवैध दारू विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याबरोबरच सामाजिक वातावरण बिघडण्याचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये