श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त संगीतमय श्री नवनाथ कथा; ४ ते १३ जून दरम्यान झी टॉकीजवर प्रसारण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त स्व. सुंबरलाल खटोड प्रतिष्ठान, बीड यांच्या वतीने ह.भ.प. वेदविभूषण श्री. उद्बोध महाराज पैठणकर (श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा) यांच्या अमोघ वाणीतून संगीतमय श्री नवनाथ कथा आयोजित करण्यात आली आहे.
ही कथा दिनांक **४ जून ते १३ जून २०२६** या कालावधीत दररोज सकाळी **७.३० ते ९.३०** या वेळेत महाराष्ट्राच्या लोकप्रिय **‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’** या कार्यक्रमातून **झी टॉकीज** वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
पुरुषोत्तम मासाच्या पुण्यपावन पर्वकाळात नाथ संप्रदायाचा इतिहास, श्री नवनाथांचे चरित्र, अध्यात्म, भक्ती आणि जीवनमूल्यांचा अनमोल ठेवा भाविकांना या कथामालेतून अनुभवता येणार आहे. श्री उद्बोध महाराज पैठणकर यांच्या रसाळ व अभ्यासपूर्ण निरूपणामुळे ही कथा भक्तांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
या संगीतमय श्री नवनाथ कथेचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी दररोज सकाळी झी टॉकीज वाहिनीवर कथा श्रवण करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



