खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी वर्धा जिल्ह्यातील कु. धनश्री धोटे आणि कु. कनक महाकाळे यांची निवड झाली आहे. मात्र, नेपाळपर्यंतच्या प्रवासाचा तसेच तेथील आवश्यक खर्चाचा निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
ही बाब निर्माण सोशल फोरमचे अध्यक्ष मा. नीरजभाऊ गुजर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ याकडे वैयक्तिक लक्ष दिले. त्यानंतर निर्माण सोशल फोरम आणि बुद्ध पहाट संघटनेच्या सहकार्याने चर्चा करून या दोन्ही विद्यार्थिनींना एकूण ₹27,500 ची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.
या आर्थिक सहाय्यामुळे धनश्री धोटे आणि कनक महाकाळे यांना आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली असून, त्यांना आज नेपाळसाठी रवाना करण्यात आले. या उपक्रमामुळे सामाजिक संस्थांनी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी तसेच त्यांच्या पालकांनी निर्माण सोशल फोरम, बुद्ध पहाट संघटना आणि मा. नीरजभाऊ गुजर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



