ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांवगी मेघे पोलीसांची दमदार कार्यवाही 2,85,759 रूपये 2,730 लिटर डिझेल / पेट्रोल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि.30/05/2026 रोजी माहिती मिळाली की मौजा दहेगाव स्टेशन शिवार काही इसमाची संशयीत रित्या हालचाल सुरू आहे. अशा माहीतीवर पोलीस स्टेशन सावंगी येथील पोलीस स्टॉफ तात्काळ घटनास्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सह रवाना झाले असता घटनास्थळावर काळया निळ्या रंगाच्या 54 प्लॉस्टीक कॅन मध्ये अंदाजे 1620 लिटर डिझेल व काळया निळ्या रंगाच्या 37 प्लॉस्टीक कॅन मध्ये अंदाजे 1110 लिटर पेट्रोल असे एकुण अंदाजे 2730 लिटर डिझेल, पेट्रोल जु.की. 2,85,759 / रूपयाचा मुदेदेमाल मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा प्रमाणे सदरचा मुददेमाल जप्त करून अज्ञात आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन सावंगी येथे गुन्हा नोद करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस स्टाफ पो.उप.नि. सतिष दुधाने, स. फौ. शरद मुन, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भगत, संजय पंचभाई, चालक पो.अनं. आकाश गोरे, सुमीत राठोड, चालक मपोअ अंजली गडेकर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये