ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र-तेलंगाना राज्यमार्गावरील पोडसा पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू

पोडसा ग्रामपंचायतीच्या आंदोलनाला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्यांना जोडणाऱ्या वर्धा नदीवरील पोडसा-व्यंकटरावपेठ पुलावरील वाहतूक तेलंगाना सरकारने महाराष्ट्रदिनी १ मे २०२६ ला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केली होती. पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कठडे उभारून मार्ग बंद करण्यात आल्याने दोन्ही राज्यांतील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या निर्णयाविरोधात पोडसा ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

ग्रामपंचायतीने स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पुलावरील बंदी उठविण्याची मागणी केली. या आंदोलनाची दखल विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी घेतली. आंदोलनाची बातमी राज्यभर प्रसिद्ध झाल्याने प्रश्नाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

दरम्यान, महाराष्ट्र व तेलंगाना या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.मार्ग खुला करण्यसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे सोबत पोडसाचे सरपंच देवीदास सातपुते यांनी भेट घेऊन मार्ग चालू करण्याची मागणी केली.

 सोबतच तेलंगणातील आशिफाबाद च्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे सोबत मीटिंग लावून मार्ग चालू करण्याची मागणी केली. सरपंच पोडसा व शिष्टमंडळ याना ३० में पर्यंत चालू करण्याचे आस्वाशन दिले व २९ मे ला लोखंडी कठड़े काढून मार्ग सुरु करुण दिला.

सततच्या पाठपुराव्यामुळे आणि जनआंदोलनाच्या दबावामुळे अखेर पोडसा-व्यंकटरावपेठ मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. मार्ग खुला झाल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोडसा ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्यांतील सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी व दैनंदिन संपर्क पुन्हा पूर्ववत झाला आहे. दोन्ही राज्यांतील जनतेने तेलंगाना सरकारचे आभार मानत पोडसा ग्रामपंचायतीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचे स्वागत केले आहे. स्थानिक नागरिकांनी भविष्यात अशा महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी संबंधित गावांना व जनतेला पूर्वसूचना देण्याची मागणी देखील केली आहे.

      दोन्हीं राज्याच्या जिला पुलिस अधीक्षक व  कलेक्टर यांचे सोबत शिस्टमण्डल घेऊन भेटी देउन मार्ग चालू करण्याबाबत मागणी केली असता, तेलंगानातील आसीफाबाद जिल्ह्याच्या अधिकार्यांनी लोखंडी कठडे काढण्याचे ठोस आस्वाशन दिले व २९ मे ला कठडे काढून मार्ग खुला केला.

                  _देवीदास सातपुते, सरपंच पोडसा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये