ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ट्रॅक्टर ट्रॉली चोरीचा गुन्हा उघड, २४ वर्षीय आरोपीला अटक

ब्रम्हपुरी पोलीस धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : स्थानिक ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडमक्ता येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधून काढण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २४ वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्वल महादेव सहारे (वय १७ वर्षे, रा. खेडमक्ता, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) यांची ट्रॅक्टर ट्रॉली दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी अज्ञात इसमाने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीने दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात येऊन तोंडी तक्रार दाखल केली. प्रज्वल सहारे यांच्या रिपोर्टवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवून तपासात घेतला. सदर गुन्ह्याचा तपास ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश गजबे हे करीत होते. तपास सुरू असतानाच, पोलीस हवालदार गजबे यांना त्यांच्या खाजगी बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गितेश संतोष निशाने (वय २४ वर्षे, रा. खरबी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी गितेश निशाने याच्याकडून चोरीस गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून सदर गुन्ह्याचा यशस्वी उकल केला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

सदरची कौतुकास्पद व धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) दिनकर ठोसरे आणि ब्रम्हपुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा गुन्हा उघडकीस आणण्यात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ट रंगारी यांनी महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये