ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाल्याची साफसफाई करून गाळ काढा!

संतोष इंद्राळे यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी

चांदा ब्लास्ट

जिवती :- जिवती शहरातील वीर बाबुराव शेडमाके चौक ते तहसील कार्यालय रस्त्यावरील असलेल्या मोठ्या नाल्यात बेशरमाची झाडे,साचलेला गाळ व मोठी पडलेली झाडे तसेच इतर झुडपांनी आक्रमण केल्यामुळे संपूर्ण नाल्याचे पात्र बंद झाले आहे ही बाब लक्षात घेता वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यास अडथळा निर्माण होऊन नाल्या लगत असलेल्या वस्तीला पुराचा मोठा धोका होऊ नये यासाठी नगर पंचायतीने तातडीने पावसाळ्याच्या आधी वाढलेली झाडे झुडपे,नाल्यातील गाळ व बेशरम काढून पाण्याचा मार्ग मोकळा करावा अन्यथा नाल्यालगतच्या वस्तीत पुराचे पाणी शिरून तेथील इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         याच नाल्याला मागील वर्षी मोठा पूर येऊन नाल्यालगत असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान सुद्धा झाले होते यास कारण ठरले ते बेशरम,साचलेला गाळ व वाढलेली झाडे झुडपे त्यामुळे पावसाचे पाणी थेट नाल्यातून वाहून जाण्याऐवजी संपूर्ण परिसरातील वस्तीत पसरून सर्वत्र पाणीच पाणी झाले होते त्यामुळे तोच प्रकार सध्या होणाऱ्या पावसाळ्यात निर्माण होण्याची शक्यता असून अतिवृष्टीच्या पावसामुळे सर्वसामान्यांच्या घरात पाणी घुसून नुकसान अथवा इमारतींना धोका होऊ शकतो तेव्हा आगामी पावसाळ्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे पुढील काळात उद्भवणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच वस्तीला धोका टाळण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून नाल्याच्या समस्येकडे लक्ष देऊन वस्तीला होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत सतर्कता बाळगून नाल्याचे सरळीकरण व त्यामध्ये वारंवार वाढणाऱ्या झुडपाबद्दल तसेच पडलेल्या झाडाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित करून धोका टाळावा अशी रास्त अपेक्षा वस्तीतील सामाजिक कार्यकर्ता संतोष इंद्राळे व्यक्त केली आहे.मागील वर्षी सुद्धा नाला तुंबल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तरी मुख्याधिकारी यांनी स्वतः याची पाहणी करून तात्काळ जेसीबी च्या सहाय्याने नाल्यातील गाळ, बेशरम, पडलेली झाडे काढून नाला मोकळा करावा. तसेच भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून नाल्याची नियमित स्वच्छता करण्याबाबत संबंधित विभागास कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संतोष इंद्राळे यांनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये