“माणुसकी अजूनही जिवंत आहे”
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरातील स्विमिंग पूल परिसरात श्री. नाविन्या जुनघरे यांचा मोबाईल हरवला होता. याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे मोबाईल हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, गांधी नगर, वर्धा येथील श्री. मंगेश सावरकर, श्री. ओम अडेकार व श्री. आयुष निधेकर यांना सदर मोबाईल मिळून आला. त्यांनी प्रामाणिकपणा व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत त्वरित सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे येऊन मोबाईल जमा केला.
सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. अनिल मेश्राम यांनी तक्रारदार श्री. नाविन्या जुनघरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचा मोबाईल श्री. मंगेश सावरकर यांचा हस्ते सुपूर्द केला.
या घटनेतून आजही समाजात प्रामाणिकपणा व माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येते. श्री. मंगेश सावरकर, श्री. ओम अडेकार व श्री. आयुष निधेकर यांच्या प्रामाणिकपणाचे वर्धा पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे.



