ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस स्टेशन भद्रावती परिसरात आग

पोलिसांच्या समयसूचकतेने टळला मोठा अनर्थ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       दि.२४ रोजी सकाळी भद्रावती पोलिस स्टेशन परिसरात असलेला कचऱ्याची विल्हेवाट लावल्या जात होती. परिसराची स्वच्छता करीत असताना देखरेखीत कचरा जाळण्यात आला. मात्र प्रखर ऊन आणि वारा यामुळे हि आग क्षणात भडकल्याने मोठा बाका प्रसंग उभा ठाकला.

विविध गुन्ह्यातील वाहने ठेवलेल्या ठिकाणी हि आग पोहचल्याने एक वाहन आगीच्या विळख्यात सापडले.

मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या समयसूचकतेमुळे तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात येऊन वेळीच आग विझविण्यात आली.

अग्निशमन दलाची तत्परता व पोलिसांची समयसूचकता यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने परिसरातील इतर वाहने आगीच्या विळख्यातून बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये