ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूर्व नियोजनाच्या अभावाने काँक्रिट रस्त्याची तोडफोड : विरोधकांची टीका

विरोधकांच्या या बालिश व आक्षेपार्य विधानांना काहीही अर्थ नाही : नगराध्यक्ष प्रफुल चटकी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      अमृत योजना २.० योजनेतील ४५० एम.एम.आकाराची पाणी वाहून आणणारी पाईप लाईन बुद्ध लेणी चौक ते बंगाली कॅम्प ते हनुमान नगर चौक ते मटन मार्केट पासून जुने पोलिस स्टेशन ते गांधी चौक ते थेट नागमंदिर चौक अशीप्रस्तावित करण्यात आली आहे. दि.२४ मे रविवार सुट्टीच्या दिवसा पासून पाईप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मात्र गोकुळ अष्टमीच्या पर्वावर मोठ्या महत्सप्राय प्रयत्नाने मस्जिद ते पुढे फुकट नगर जाणाऱ्या मार्गाचे सिमेंट काँक्रिटकरण करण्यात आले होते.

सदर काँक्रीटीकरण करताना पुढे भविष्यात पाणी पुरवठा पाईप टाकावी लागतील याचे कोणतेही पूर्व नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रस्तावित पाईप लाईन करिता किमान ४ फूट रुंद व ४० फूट लांब ते ही चक्क मार्गाच्या मधोमध काँक्रिट रोड चे खोदकाम करण्याची नामुष्की ओढवाली आहे.

स्थानिक नगर परिषद व सबंधित साईनाथ कन्स्ट्रक्शन कंपनी च्या पूर्व नियोजनाच्या अभावाने करदात्या नागरिकांच्या कर रुपी उत्पन्नाचा अपव्यय होत असल्याचा सूर उमटू लागला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांचेशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

      वाढीव पाणीपुरवठा योजना दारोदारी पोहचविण्या करिता सध्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. आम्ही सत्तेत येताच सर्व आढावा घेऊन पूर्वीच्या मार्गात बदल केला. अन्यथा विंजासन सिमेंट रस्त्याची तोडफोड झाली असती. त्यामुळे किरकोळ उत्खनन करण्यात येऊन लगेच कायम स्वरुपी दुरुस्ती करण्यात येईल. प्रसार माध्यमातून व्यक्त होणाऱ्या विरोधकांच्या या बालिश व आक्षेपार्य विधानांना काहीही अर्थ नाही. 

     नगराध्यक्ष प्रफुल चटकी, नगर परिषद भद्रावती

         सिमेंट काँक्रिट रोड ची तोडफोड करून नागरिकांच्या कर रुपी पैशाची उधळण करण्याचा हा प्रकार आहे.पूर्वनियोजन करून आधीच पाईप लाईन टाकली असती तर अवघ्या काही दिवसापूर्वी तयार रस्ता मधोमध फोडण्याची नामुष्की ओढवली नसती.आधी मूल नंतर लग्न असा हा अफलातून आहे. 

              अनिल पडोळे, काँग्रेस नगरसेवक

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये